::: भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे :::
दि. ४ फेब्रुवारी २०१८ रोजी संपन्न झालेल्या राष्ट्रीय महाअधिवेशनात समाजातील अनिष्ट प्रथांविषयी चर्चा होऊन खालील ठराव मंजूर करण्यात आले.
  1. लग्न समारंभ साध्या पद्धतीने करावेत व अनावश्यक खर्च टाळावा.
  2. विवाहात बँड, डीजे, फटाके यांचा वापर टाळावा.
  3. साखरपुडा कार्यक्रम साध्या पद्धतीने करावा.
  4. मुलांकडून मुलींसाठी साडी देण्याची प्रथा बंद करावी.
  5. वारल्यानंतर साडी-चोळी देण्याची प्रथा बंद करावी.
  6. प्रत्येक लग्नामध्ये पंचायतच्या नावाने किमान ₹२५० देणगी पावती फाडावी.
  7. लग्नात रुबाबदार दरवाजे, स्टेज यांची प्रथा बंद करावी.
  8. मंडळातील सर्व भाऊबंदांनी एकोप्याने कार्यक्रम करावा.
  9. सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून खर्च वाचवावा.
  10. ढोल-ताशा व मोठ्या जेवणावळीची अपेक्षा टाळावी.
  11. लग्नानंतर सत्यनारायण पूजेसाठी वधूपक्षाकडून लोक नेण्याची प्रथा बंद करावी.
  12. मुलींनी सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्यावरून जाताना तोंडावर स्कार्फ बांधू नये.
चौथ्या महाअधिवेशनात मंजूर झालेल्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे आपण ठरविले आहे.