::: भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे :::

निर्धार-गीत

आपुला आपण करु उद्धार कचऱ्या सारे हा निर्धार राहू। सुखदु:खाचा कुणी नच दाता आपुले आपण भाग्यविधाता अधोगती उन्नतीस नेती आपुले कार्यविचार ॥१॥ आपुल्यापुरते अहसार दिसते अमुचे डोळे अहसार पुरते विशाल सुंदर जीवन सागर मग कसला दिसणार ॥२॥ जो तो सोयास्वार करी धावा स्वार्थ कुणाला कसा सुटावा एक झापडे उभारून का दुजे साफ करणार ॥३॥ जरा बघावे अवती भवती घराघरी तर एकच माती सुखदु:खाचे देणे घेणे हाच खरा व्यवहार ॥४॥ तळ्यातमळ्यातील गढूळ पाणी जरा वाद वा बांध फोडुनी मानुसकीची नितळ निळाई जीवनी मग दिसणार ॥५॥ आपुले भांडण हे आपल्याशी नव्हे मागणे कुणाशाशी नाते जोड भगवंताशी हाच कर निर्धार ॥६॥
– कवी : भानू चौधरी